बंकूरा – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. आपल्या प्रत्येक सभेतून ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेकांवर जहरी टीका करताना दिसत आहेत. याच पार्श्ववभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना तृणमूल काँग्रेसमधील एक नेता कोळसा माफिया असल्याचा आरोप लावला होता.
पंतप्रधानांच्या या आरोपाला उत्तर देताना आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना खुलं आव्हान दिलं आहे. त्या म्हणाल्या, “मी पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ इच्छिते की त्यांनी आमचा एक नेता कोळसा माफिया असल्याचा आरोप केला होता. पंतप्रधानांनी जर आपला आरोप सिद्ध करून दाखवला तर मी निवडणुकांमधील माझ्या सर्वच्या सर्व ४२ उमेदवारांची उमेदवारी रद्द करेन पण जर मोदींचा आरोप खोटा निघाला तर त्यांना जनतेसमोर आपले कान पकडून १०० उठाबशा माराव्या लागतील.”
दरम्यान, आज सकाळी पश्चिम बंगाल येथील पुरुलिया येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांना उद्देशून, “तुमची कानशिलातही माझ्यासाठी आशीर्वाद आहे. परंतु, हीच कानशिलात तुम्ही तुमच्या साथीदारांना देण्याची हिम्मत दाखवली असती तर चिटफंड घोटाळा झाला नसता. माँ, माटी आणि मानुषी यांच्या गोष्टी करून सत्तेत आलेल्या ममता बॅनर्जींना जनतेशी काही देणेघेणे राहिलेले नाही. ममता बॅनर्जींनी सत्तेच्या नशेत पहिले पश्चिम बंगलला बर्बाद केले आणि आता सत्ता जाण्याच्या भीतीने त्या बंगालला उद्ध्वस्त करत आहेत.” अशी जहरी टीका केली होती.
West Bengal CM Mamata Banerjee in Bankura: I challenge you (PM Modi) if you can prove your allegations that one of us is part of coal mafia, I will withdraw all my 42 candidates. If you are lying, you have to hold your ears and do a hundred sit ups before public. pic.twitter.com/mBQT59MP4J
— ANI (@ANI) May 9, 2019