नवी दिल्ली – भारताचा कर्णधार ‘विराट कोहली’चे देशातच नाहीत, तर परदेशातही चाहते आहेत. पण एक चाहता असाही आहे ज्याने आपल्या संपूर्ण शरीरावर विराट कोहलीचे टॅटू काढले आहे. त्याने पहिला टॅटू सन २०१६ मध्ये कोरला असून, हा टॅटू विराटाच्या चेहऱ्याचा आहे.
दरम्यान, विराटच्या या अनोख्या चात्याचे नाव पिंटू बेहरा आहे. पिंटू हा ओडिशा राज्यातील बरहामपूर येथील राहणारा आहे. त्याने पहिला टॅटू आपल्या छातीवर उजव्याबाजूला कोरला होता. हा पहिला टॅटू त्याने विश्वचषकादरम्यान बनवले होते. आता त्याच्या पिंटूच्या शरीरावर कोहलीचे एकूण १६ टॅटू आहेत.