मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून मीच चांगली कामगिरी करू शकतो व संघाला विश्वविजेतेपदही मिळवून देऊ शकतो, असा विश्वास विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी दाखवला व त्यामुळेच टीम इंडियाने 2011 साली विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा जिंकली, अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक व दक्षिण आफ्रिकेचे माजी कसोटीपटू गॅरी कर्स्टन यांनी खुलासा केला आहे.
भारतीय संघाला दिशा देण्याचे काम एक प्रशिक्षक म्हणून मी करू शकतो, असा विश्वास गावसकर यांनी व्यक्त केला होता. या पदासाठी गावसकर यांनीच माझी शिफारस केली होती. गावसकर यांच्या सल्ल्यामुळे बीसीसीआयने माझी नियुक्त केवळ काही मिनिटांमध्येच केली, असेही कर्स्टन यांनी सांगितले.