‘त्या’ विधानबद्दल मी माफी मागतो – अमिताभ बच्चन

मुंबई – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केल्याने नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे नेटकऱ्यांनी सोनी वाहिनी आणि बच्चन यांना धारेवर धरले होते. याच पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांनी ट्विटद्वारे ट्विट करत जाहीर माफी मागितली आहे.


अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले आहे की, ‘माझा कुणाचाही अनादर करण्याचा हेतू नाही, मात्र माझ्यामुळे भावना दुखावल्या असल्यास मी दिलगीर व्यक्त करतो..’ असे ही त्यांनी म्हंटले आहे.

तत्पूर्वी, गुजरातच्या शाहेदा चंद्रन या हॉटसीटवर असताना त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला. यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले. यामध्ये महाराणा प्रताप, राणा सांगा, महाराजा रणजीत सिंह आणि शिवाजी असे पर्याय देण्यात आले होते. यावरुनच अनेकांनी सोनी वाहिनी, मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरुद्ध अनेकांनी ट्विटवरुन राग व्यक्त केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.