“मोदींच्या संमतीने कोकणचा दौरा करतोय, माझ्या साथीला फडणवीस-दरेकर’- नारायण राणे

मुंबई – कोकणात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. चिपळूण, महाड, खेड तालुक्यात महापूरानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोकणची साधी भोळी माणसं उन्मळून पडलीत. कालपर्यंत समृद्ध असणारी ही माणसं आज संकटात सापडली आहेत.

याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोकण दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संमतीने कोकणचा दौरा करतोय,

यावेळी फडणवीस आणि दरेकर साथीला असणार आहेत, असं ट्विट नारायण राणे यांनी केलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील चिपळूणचा दौरा करत आहेत.

काय आहे नारायण राणे यांचं ट्विट –

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्‍यासह रायगड जिल्ह्यातील तळये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहे.” या आशयाचे ट्विट राणेंनी केलं आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.