जहानाबाद – लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजप्रताप यादव तेजस्वी यादव यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. मी लालू प्रसाद यादवांचे रक्त आहे. मी खरा वारीस असून असून बिहारचा दुसरा लालू यादव आहे, असा दावा तेजप्रताप यादव यांनी केला आहे. जहानाबादमध्ये त्यांचे उमेदवार चंद्रप्रकाश यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
तेजस्वी यादव यांच्यावर टीका करताना तेजप्रताप यादव म्हणाले, ते (लालू यादव) खूप उत्साही व्यक्ती होते. ते एका दिवसात १० ते १२ प्रचारसभा घेत होते. परंतु, काही नेते (तेजस्वी यादव) दोन सभा घेऊन लगेच थकून जातात. मागील काही दिवसांमध्ये तेजस्वी यादव यांनी प्रकृती अस्वस्थ असल्याने अनेक सभा रद्द केल्या होत्या. ते पुढे म्हणाले, मी लालू यादव यांचे रक्त आहे. लालू आमचे आदर्श गुरु आहेत. मी बिहारचा दुसरा लालू यादव आहे, असा दावाही तेजप्रताप यांनी केला.
I am second Lalu Yadav in Bihar, says Tej Pratap Yadav
Read @ANI story | https://t.co/tQfxdg6epo pic.twitter.com/irG1HyGQoC
— ANI Digital (@ani_digital) May 3, 2019