कार्ला (वार्ताहर) – एकवीरा विद्या मंदिर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 179 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक शहाजी लाखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
बालिका दिनाचे औचित्य साधात बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेची विद्यार्थिनी सानिया गायकवाड हिने सावित्रीबाई यांची वेशभूषा धारण करीत “मी सावित्रीबाई बोलतेय’ असा एकपात्री कार्यक्रम सादर केला. श्वेता हुलावळे यांनी सावित्रीबाई यांच्या कार्याची ओळख करून दिली.
शाळेतील विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलेचे यामध्ये डॉक्टर, खेळाडू, शिक्षिका, आयपीएस आधिकारी यांची वेशभूषा केल्या होत्या. या वेळी शिक्षक प्रतिनिधी संतोष हुलावळे, काकासाहेब भोरे, विकास दगडे, दिलीप पोटे, उमेश इंगूळकर, सचिन हुलावळे, नाजुका सोनकांबळे, अनुराधा हुलावळे, श्वेता हुलावळे, मीरा शेलार, अरुणा बुळे, काजल गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन वर्गशिक्षक उमेश इंगूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रास्तविक विद्यार्थिनी समीक्षा गरूड केले. सूत्रसंचालन प्रणाली देशमुख हिने केले. ऋतुजा चव्हाण हिने आभार मानले.