कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला जोर चढला असून तृणमूल काँग्रेसने आक्रमक प्रचार सुरू केला आहे. तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यास इच्छूक आहे. तर भाजपने तृणमूल काँग्रेसला जोरदार आव्हान दिलं आहे. मात्र भाजपने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. या पदासाठी आता अभिनेते मिथून चक्रवर्ती इच्छूक असल्याचं समजतं.
काही दिवसांपूर्वीच भाजपवासी झालेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य केले आहे. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होण्यास आपली तयारी आहे. आता पक्षाने काय तो निर्णय घ्यावा असे मिथून यांनी म्हटले आहे.
मिथून म्हणाले की, भाजप मोठा पक्ष आहे, जर माझ्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता असेल तर मी नक्कीच मुख्यमंत्री होईल. माझ्या पक्षात अनेक लोक मुख्यमंत्रीपदासाठी लायक आहेत. पण हा निर्णय सर्वस्वी वरिष्ठ नेत्यांचा आहे असेही मिथून म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदींनी आदेश दिले तर आपण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार आहोत.