मुंबई : संजय राऊत यांना ईडी कडून चौकशीसाठी बोलावण्यात आले. आज १२ वाजण्याच्या दरम्यान ईडी कार्यलयामध्ये ते चौकशीकरिता हजरही राहिले आहेत. ईडी कार्यालयाच्या आवारात त्यांनी माध्यमांशी बातचीत केली. यावेळी बोलताना मी पळपुटा नाही ,ईडीवर माझा विश्वास आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावेळी दिली.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले , मी अत्यंत निडर माणूस आहे. माझा काही गुन्हा नसल्यामुळे निडरतेने चौकशीला सामोरे जातो आहे. चौकशीला सामोरे जाण्याची माझ्यामध्ये हिंम्मत आहे. या देशाचा नागरिक म्हणून माझं हे कर्तव्य आहे की मी चौकशीला सामोरं जावं. मी पळपुटा नाही” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
Mumbai | I am a fearless person. I am fearless because I've never done anything wrong in my life. If at all this is political, we will get to know that later. Right now, I feel I am going to a neutral agency & I trust them completely: Shiv Sena leader Sanjay Raut pic.twitter.com/JlFqgciMC1
— ANI (@ANI) July 1, 2022
शिवसैनिकांची गर्दी
दरम्यान संजय राऊत ईडी कार्यालयामध्ये चौकशीकरिता हजार झाले असताना कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आम्ही शिवसेनेसोबत आहोत अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
संजय राऊत नरमले
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वीच ईडीने त्यांना समन्स बजावले होते. मात्र राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ईडीकडे वेळ मागितला होता. मात्र गुरुवारी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज राऊत ईडीसमोर चौकशीला हजर राहिले आहेत. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो, तपास यंत्रणांना सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे, असं ट्विट त्यांनी केलं. नवी सत्ता आल्यानंतर सतत टीका करणारे संजय राऊत हे नरमल्याचे दिसत असून त्यांनी आता चौकशीला सहकार्य करणार असल्याचे म्हंटले आहे.