पुणे – अभिनेत्री ऋचा चढ्ढा सध्या “शकीला’ या आपल्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. तिने अलीकडेच “मॅडम चीफ मिनिस्टर’ या सिनेमाचे पोस्टर रिलीज केले होते. या सिनेमात ती राजकीय नेत्याच्या रोलमध्ये दिसणार आहे. पोस्टरमध्ये तिच्या हातात झाडू दाखवला गेला आहे. ही गोष्ट काही लोकांना अजिबात आवडली नाही. यावरून ऋचा चड्ढाला केवळ आक्षेप नाही तर आता जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. इतकेच नाही तर तिची जीभ कापणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर, आता ऋचा चड्ढा ब्राह्मणवादी असल्याचा आरोप एका आंबेडकरी अनुयायाने केला होता.
SAVARNA SISTERHOOD.. https://t.co/WylqXY0ya1
— Deepali Salve🐦 (@deepalisalve12) January 20, 2021
यावर आता तिन ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. ती म्हणाली की,’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझेही आयकॉन आहेत. त्यांचा टी-शर्ट परिधान करणे हा माझाही अधिकार आहे. आणि सोशलवर माझ्याबाबत ब्राह्मणवादी असल्याचा आरोप केला जातोय. तसे मी असे कधीही आणि कुठेही विधान केले नाही. विशेष म्हणजे मी ब्राह्मण नाही, हे लक्षात ठेवा, खोटारडे.. असे रिट्विट रिचाने केलंय. सोशलवर व्हायरल झालेल्या अफवांवर तिने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
I have never said this,ever,anywhere! Stop lying. I don’t need your validation to wear a T-shirt with my icons face on it.
ऐसा मैंने कभी, कहीं नहीं कहा। ये शर्मनाक झूठ है। अम्बेडकर मेरे भी icon हैं, उनकी T shirt पहनना, मेरा भी अधिकार है।और मैं ब्राह्मण नहीं हूं,जान लें।#Liar pic.twitter.com/wyrUfevYIE— TheRichaChadha (@RichaChadha) January 20, 2021
View this post on Instagram
दरम्यान,ऋचा चढ्ढाने पोस्टरच्या मुद्द्यावरून सर्व संबंधितांची माफी मागितली आहे. हा सिनेमा आपल्यासाठी एक प्रशिक्षणाचा अनुभव आहे. पोस्टर रिलीज करताना नागरिकांच्या भावना काय असू शकतील याचा विचार केला गेला नव्हता. लोकांना राग येणे स्वाभाविक आहे. हा प्रमोशनचा प्रयत्न होता असे ऋचाने आपल्या या निवेदनात म्हटले आहे. या पोस्टरबाबत तिने निर्मात्यांना दोष दिलेला नाही. हे वादग्रस्त पोस्टर निर्मात्यांनी तातडीने हटवून नवीन पोस्टर रिलीज केले गेले आहे.