मी पोस्ट प्रेग्नेंट करीना कपूरसारखी – कंगणा राणावत

बॉलिवुड अभिनेत्री कंगणा राणावतने आपल्या आगामी “थलाइवी’ या चित्रपटासाठी तब्बल 20 किलो वजन वाढवले आहे. हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगणाने वजन वाढविले आहे. असो, कंगना नेहमीच तिचे पात्र साकारण्यात मग्न असते. अशा परिस्थितीत चारित्र्यानुसार तिने वजनही वाढले. दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीत कंगनाने वजन वाढविण्याचा संबंध थेट करीना कपूरशी जोडला आहे.

होय, एका मीडिया हाऊसशी बोलताना कंगना म्हणाली, जेव्हा करीना गर्भवती होती, तेव्हा तिचे वजन 16 किलोने वाढले होते. म्हणून मी म्हणू शकते की, “मी पोस्ट प्रेग्नेंट करीना कपूरसारखी आहे.’ अनफिटस असल्याचे विचारले असता कंगना म्हणाली, नाही, वजन वाढल्यानंतर मला असं कधीच वाटलं नाही. पण, एकदा मला बसलेली असताना उठताना आधार घ्यावा लागला होता. त्यानंतर मला कधीच अडचण आली नाही.’

या मुलाखतीदरम्यान कंगनाने असाही खुलासा केला की, एक वेळ अशी आली की मी खूपच वजन वाढविले आहे का?, असे मला वाटू लागले. तसेच वजन कमी करताना कोणती अडचण येणार नाहीना.
दरम्यान, आता कंगणा वजन कमी करण्यासाठी सतत वर्कआउट करत आहे. त्यांच्या टीमने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात कंगणा वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत असल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.