मुंबई – तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे लोकनेते आर. आर. (आबा) पाटील यांच्या जीवनावर आधारित “आठवणीतले आबा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यानिमित्तानं आयोजित शेतकरी मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केलं. सोबतच नूतन ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी सदस्य सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलतांना अजित पवार यांनी नाव न घेता गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे.
अजित पवार म्हणाले,’मी तर बारामतीमधून लाखोंच्या मताने निवडून येतो. आणि पार्सल आणलेल्यांना परत पाठवतो.’ अशी टीका पवार यांनी केली, ते पुढे म्हणाले,’तासगावकरांनो आर. आर. पाटील यांना कधी तुम्ही चांगल्या मतांनी निवडून दिला आहे का? का रे बाबांनो मात्र हाच आबा यांनी संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या वक्तृत्वाने आकर्षित केलं होतं. पण कधी तुम्ही आबांना भरपूर मताधिक्याने निवडून दिलं नाही’.’मी तर बारामतीमधून लाखोंच्या मताने निवडून येतो.आणि पार्सल आणलेल्यांना परत पाठवतो’ असेही ते म्हणाले आहे.