मुंबई – बेळगाव येथे सीमालढ्यात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर गेले असता बेळगाव पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निषेध व्यक्त केला असून मी उद्या बेळगावला जात आहे. पाहू काय घडतंय, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा सीमाप्रश्न चिघळण्याची चिन्हे आहेत.
भाषावार प्रांतरचना झाल्यापासून बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, संतपूरसह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी अनेक लढे झाले. यातीलच एक १७ नोव्हेंबर १९५६ रोजीचा लढा. संयुक्त महाराष्ट्रासाठी बेळगाव आणि निपाणी येथे झालेल्या आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. दरवर्षी १७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौकात अभिवादन करण्यात येते.
यासाठी गेलेल्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सीमेबाहेर सोडले. यावर संजय राऊत म्हणाले कि, महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र येड्रावकर यांना कर्नाटक पोलीसांची धक्काबुक्की केली. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्या पासून रोखले. महाराष्ट्र भाजपा या कर्नाटकी दहशतवादाचा साधा निषेध तरी करेल काय? असा प्रश्न महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना विचारला आहे. तसेच मी उद्या बेळगावला जात आहे.
पाहू काय घडतंय, असे म्हणत इशारा दिला आहे.
महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र येड्रावकर यांना कर्नाटक पोलीसांची धक्काबुक्की..
हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्या पासून रोखले..महाराष्ट्र भाजपा या कर्नाटकी दहशतवादाचा साधा निषेध तरी करेल काय?
मी ऊद्या बेळगावला जात आहे.
पाहू काय घडतंय.
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) January 17, 2020