नवी दिल्ली – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल दोन वर्षांनंतर शुक्रवारी (17 मार्च) फेसबुक आणि यूट्यूब अकाउंटवर एक पोस्ट लिहिली. सध्या त्यांच्या या पोस्टची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. “मी परत आलो आहे…’ असं त्यांनी म्हंटलं आहे. दोन वर्षांच्या बॅननंतर फेसबुकवर आपली पहिली पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
तसेच, ट्रम्प यांनी 12-सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे, ज्यामध्ये ते 2016 च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांचे विजयी भाषण देताना दिसत होते, “तुम्हाला जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागली..’ असं ते म्हणाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्व सोशल मीडिया खात्यावर दोन वर्षांपूर्वी बंदी घातली होती.
त्यामध्ये फेसबुक-इन्स्टाग्राम, ट्विटर यांचाही समावेश होता. काही महिन्यांपूर्वी मस्क यांनी ट्विटर खरेदी केले त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पुन्हा सुरू केले. त्यापाठोपाठ फेब्रुवारीमध्ये मेटाने ट्रम्प यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम खाते पुन्हा रिस्टोअर केले होते. तर शुक्रवारी यु ट्यूबने देखील ट्रम्प यांच्यावरील बंदी हटवली. त्यामुळे ते पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत.
दरम्यान, ट्रम्प यांचे फेसबुकवर 34 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर यूट्यूबवर त्यांचे 2.6 दशलक्ष सदस्य आहेत. 6 जानेवारी 2021 रोजी जो बिडेन यांच्या विजयानंतर ट्रम्प यांच्या समर्थकांनी यूएस कॅपिटलवर हल्ला केला होता. तेव्हा पासून त्यांचे सर्व सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यात आले होते.