मी ‘कोरोना’ने पीडित आहे, ऐकताच बलात्काऱ्यांला बसला धक्का अन्

नवी दिल्ली – चीनमधे करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ७२२वर गेली आहे. या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही ३४,५४६ वर पोचली आहे. मात्र कोरोनामुळे एका मुलीचा जीव वाचला आहे.

कोरोना व्हायरसने प्रभावित वुहान नजीकच एक जिंगशान नावाचा शहर आहे. घरात कोणी नसल्याचे पाहून आरोपी पीडितेच्या घरात घुसला आणि बलात्काराचा प्रयत्न करू लागला. यादम्यान पीडितेने खोकत मी वुहान शहरातील असून मला कोरोनाची लागण झाला असल्यानेच मला घरात एकटीला ठेवले आहे, असे आरोपीला सांगितले. हे ऐकताच आरोपीला धक्का बसला आणि पीडितेला जोरात लांब ढकलले. यानंतर पिडीतेजवळील ३,०८० युआन चोरी करून आरोपीने तेथून पलायन केले.

दरम्यान, चीनपुरता कोरोना व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे ३० देशांतील १५० लोकांना त्याची लागण झाली आहे. संसर्ग होऊ नये, यासाठी चीनने तर दोन राज्यांतील लोकांना अन्य राज्यांमध्ये जाण्यासच बंदी घातली आहे. काही शहरांमधील लोकांना घराबाहेर पडायलाही बंदी आहे. अवघ्या १५ सेकंदात एका व्यक्तीला ‘कोरोना’ची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.