सातारकरांच्या प्रेमाबद्दल मी शतश: ऋणी : नरेंद्र पाटील

सातारकरांनी जे माझ्यावर भरभरून प्रेम दाखवले त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. यंदाची लोकसभा निवडणूक माझ्यासाटी एक कार्यशाळाच ठरली आहे. माझ्यासाठी प्रचार यंत्रणेत राबणा या कार्यकर्त्यांची मी मोठी साखळी बघितली. चार लाखाहून अधिक मते देत मतदारराजाने माझ्यावर प्रचंड प्रेम दाखवले. भाजप शिवसेना जिल्हा कार्यकारिणी शिवसेना प्रमुख उध्दवजी ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार शंभूराज देसाई तसेच युतीच्या सर्व सदस्यांनी माझ्यासाठी जे कष्ट उपसले त्यांचा मी आभारी आहे.

लोकसभेचा हा जनादेश मी मनापासून स्वीकारलेला आहे, माझे काम इथेच संपले नाही उलट कामाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याच्या अनेक प्रश्‍नांची सोडवणूक करण्याकरिता माझ्याकडून संपूर्ण सहकार्य राहिल. लोकसभा व त्या ओघाने येणारी खासदारकी त्यामुळे कामाला प्रचंड वाव मिळतो. जनादेश वंद्य मानून सातारा जिल्ह्याच्या हितासाठी झटत राहणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. या निवडणुकीने मला बरेच काही शिकवले बरीच माणसे या निमित्ताने जोडली गेली. मला सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्‍न समजावून घेता आले. या राजकीय अनुभवाने मला प्रचंड उर्जा दिली आहे, त्याचा उपयोग मला आगामी वाटचालीत होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.