मुंबई : राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा ‘लाचखोर नवऱ्याची बायको’, असा यांचा उल्लेख करतत्यांच्यावर बोचरी टीका केली होती.. याच टीकेला आता चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “मी वाघ आहे वाघ… कशी ती तुमच्या बापाला जाऊन विचारा…”अशा शब्दात त्यांनी महेबूब शेख यांच्यावर पलटवार केला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर कडाडून टीका केलीये. “चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, अशी बोचरी टीका करत आमदार निलेश लंके यांच्यावरील टीकेचा मेहबूब शेख यांनी खरपूस समाचार घेतला.
वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत 🤣😂
कारण
मी पिडीतांच्या पाठीशी उभी रहाते म्हणूनसत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू
मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या
वाघ आहे मी लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 6, 2021
वाघावर…कोल्हे कुत्रे भुंकताहेत कारण मी पिडीतांच्या पाठीशी उभी राहते म्हणून……. पण शेवटी मी वाघ आहे… लक्षात ठेवा..कोल्ह्या कुत्र्यांना मी घाबरणारी नाही’, अशा शब्दात त्यांनी मेहबूब यांचा वार परतावून लावला आहे. मेहबूब यांच्या टीकेला उत्तर देणारं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
‘सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करुन झाले…. आता माझ्या परिवाराची बदनामी सुरु आहे. पण मी अ्सल्या प्रकाराला घाबरत नाही. मी काय आहे..काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या’, असं उघड आव्हानच त्यांनी शेख यांना दिलं आहे.