हुबळी (कर्नाटक) :– मी हिंदू आहे, पण राजकीय हिंदुत्वाला कायम विरोध करत आलो आहे. अयोध्येतील राम मंदिराला आम्ही कधीच विरोध केला नाही. परंतु राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर करण्याच्या विरोधात आहे, असे कॉंग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. तसेच कर्नाटकच्या ग्रामीण भागात अनेक राम मंदिरे बांधल्याचा दावाही त्यांनी केला.
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर सिद्धरामय्या म्हणाले, अयोध्येतील राम मंदिराला माझा कधीच विरोध नव्हता. आम्ही कधी राम मंदिराला विरोध केला होता का?
आमचा आक्षेप केवळ राजकीय फायद्यासाठी मंदिराचा वापर करण्यावर आहे. त्याचा वापर इतर धर्माच्या लोकांविरुद्ध होऊ नये. भाजप त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
Maharashtra : महिला आयोगाच्या नोटीसीनंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या” अशा 56…”
मी हिंदू आहे. मी हिंदूविरोधी कसा असू शकतो? मी हिंदुत्व आणि हिंदू धर्माच्या भोवतीच्या राजकारणाला विरोध करतो. कारण भारतीय राज्यघटनेनुसार सर्वधर्म समान आहेत. भारताची बहु-धार्मिक संस्कृती असून येथे सर्वांना सोबत घेतले पाहिजे आणि प्रत्येकाला माणूस म्हणून पाहिले पाहिजे. संविधान हेच सांगते आणि आपण त्याचे पालन केले पाहिजे, असे ते म्हणाले.