नगर – राष्ट्रवादी कॅंग्रेसचे अकोलेचे आमदार वैभव पिचड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून संगमनेरचे त्यांचे निकटवर्ती व राष्ट्रवादीचे युवक जिल्हा अध्यक्ष कपिल पवार हे त्यांच्या सोबत जाणार असल्याची चर्चा सोशल मिडीयावर फिरत असून कपिल पवार यांनी याबाबत खुलासा केला असून ते राष्ट्रावादी पक्षाबरोबरच राहणार असल्याचे सांगितले.
शरदचंद्र पवार व अजित पवार यांचे सोबत मी निष्ठेने काम करत आहे. व यापुढेही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.शरद पवार यांचे पुरोगामी विचार व पक्षाचे ध्येय धोरणे समाजात रुजवून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या माध्यमातून जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शनानुसार आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काम करत राहणार आहे.