नगर -नगरमधील हायजीन फर्स्ट या संस्थेतर्फे विविध विषयांवर घेण्यात आलेल्या स्पर्धांचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. संस्थेच्या संस्थापक वैशाली गांधी यांनी आज या स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर केली.
नगरकरांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी वैशाली गांधी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात स्वच्छता विषयक उपक्रम असलेल्या “माय हायजिन, माय लाइफ” म्हणजेच “माझी स्वच्छता माझे जीवन” या विषयावर स्पर्धा घेतली होती. त्याला सर्वच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याबाहेरील लोकांपर्यंत देखील स्वच्छतेची जनजागृती करण्यात आम्ही यशस्वी झालो, अशी भावना गांधी यांनी व्यक्त केली. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे.
निबंध स्पर्धा: प्रथम: प्रार्थना प्रशांत पारख (संगमनेर), द्वितीय: महेश वसंतलाल गांधी (नगर) तर तृतीय क्रमांक साधना प्रसाद कुकडे (सावेडी) व प्रणव शरद भैलुमे यांना विभागून देण्यात आला.
वक्तृत्व स्पर्धा : प्रथम सिद्धी संतोष झिने (नगर), द्वितीय गौरी निर्मल मुथा (नगर) तृतीय क्रमांक कृष्णा गिरीश कुकरेजा (नगर) यांना देण्यात आला. याच स्पर्धेत मोठा गटात वंदना शिंदे (परभणी)हीने प्रथम व द्वितीय क्रमांक श्रुती कमलेश पितळे (नगर) हीने मिळविला.
उखाणा स्पर्धा : प्रथम सीमा अतुल गुगळे (नगर), व द्वितीय क्रमांक ज्योती संतोष रोकडे हीने मिळविला.
स्लोगन स्पर्धा : प्रथम रोकडे संतोष मालबा (नगर) व द्वितीय क्रमांक सृष्टी अतुल गुगळे (नगर) हीने मिळविला. व्हिडिओ मेकिंगमध्ये न्यु संकल्प ग्रुप (नगर) यांनी विशेष उल्लेखनीय पारितोषिक मिळविले. चित्रकला स्पर्धेत मोठ्या गटात खुशी मनोज बोरा (नगर) हीने प्रथम, प्रार्थना पारख हीने द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक निधी संचेती व अनुष्का पंडित यांना देण्यात आला. याच स्पर्धेतील छोट्या गटात धनिश्का गुगळे हीने प्रथम, पलक पाटणी हीने द्वितीय तर अर्पिता मुथा (नगर) हीने तृतीय क्रमांक मिळविला. आय लव्ह नगर, रेडिओ सिटी, टीम हायजिन फर्स्ट यांच्या सहयोगाने ही स्पर्धा यशस्वी झाली असल्याचे वैशाली गांधी यांनी सांगितले.