आता हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाही

करोना संदर्भातील उपयोगिता वाढली

पुणे – आरोग्य मंत्रालयाने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाला शेडूल एच -1 औषधी घोषीत केले आहे. त्यामुळे देशभरातील मेडिकल स्टोअर मध्ये हे औषध केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन च्या माध्यमातूनच उपलब्ध होऊ शकणार आहे.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार करोना संबंधात या औषधाचा उपयोग वाढला आहे. त्यामुळे या औषधाचा देशात आवश्यक साठा असण्याची गरज आहे. यासाठी आरोग्य मंत्रालयाने तातडीने परिपत्रक काढून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध डॉक्टरांनी लेखी शिफारस केल्याशिवाय मेडिकल स्टोअर्सना विकता येणार नसल्याचे सांगितले आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध आणि यासंबंधीच्या कच्चा मालाच्या पुरवठयाकडे आणि साठयाकडे आता केंद्र सरकारचे लक्ष राहणार आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची उपयोगिता ध्यानात घेऊन केंद्र सरकारने परवा या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. करोना व्हायरसचा संसर्ग झालेले रुग्ण आणि या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध उपयोगी असल्याचे आढळून आले आहे. अमेरिका व फ्रान्ससह भारतातही या संदर्भात गेल्या पंधरवड्यात प्रायोगिक पातळीवर भरपूर काम झाले आहे. त्या अनुसार भारत सरकारने आता हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध फक्त प्रिस्क्रिप्शनद्वारेच भारतात उपलब्ध होऊ शकेल असे सांगितले आहे. यामुळे केवळ माहितीच्या आधारावर औषधाच्या दुकानातून हे औषध घेण्याचा प्रकार कमी होईल असे सरकारला वाटते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.