नवी दिल्ली : हैदराबाद एफसी संघाने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात नार्थईस्ट यूनायटेड एफसीवर ५-१ ने मात करीत इंडियन सुपर लीग स्पर्धेचा समारोप गोड केला.
.@HydFCOfficial end their maiden #HeroISL campaign on a positive note in Guwahati 👍#NEUHFC #LetsFootball pic.twitter.com/euhYalTX0P
— Indian Super League (@IndSuperLeague) February 20, 2020
हैदराबादकडून लिस्टन कोलासो याने १२ व्या आणि ४१ व्या मिनिटाला असे २ तर मार्सेलिन्हो याने १३ व्या आणि ८८ व्या मिनिटाला असे २ गोल केले. मोहम्मद यासिरने ५५ व्या मिनिटाला गोल केला. पराभूत संघाकडून एकमेव असा गोल एंड्र्यू कियोग याने ३५ व्या मिनिटाला केला.
यासह हैदराबादने १८ सामन्यात १० गुण प्राप्त करत गुणतालिकेत शेवटचे स्थान मिळवित स्पर्धेतील आपला समारेप केला. नार्थईस्टचा संघ १३ गुणांसह ९ व्या स्थानावर कायम असून त्यांचा एक सामना बाकी आहे.