#HyderabadEncounter: तेलंगणा पोलिसांचे सर्वस्तरातून कौतूक

नवी दिलली : हैद्राबादमध्ये महिला पशुवैद्यकीय डॉक्‍टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणातील चारही आरोपींचे आज सकाळी तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर केले आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक केले जात आहे.


आरोपींचा खात्मा केललेल्या पोलिसांवर पुष्पवृष्टी करत तेलंगणातील जनतेने त्यांचे आभार मानले आहे.


तर दुसरीकडे तेलंगणाच्या पोलिसांच्या हातावर राखी बांधून काही महिलांनी एका भावाने आपले कर्तव्य पार पाडले असल्याच्या भावना व्यक्‍त केल्या आहेत.

तसेच तेलंगणामध्ये सर्वत्र सध्या आंनदाचे आणि कौतूकाचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. सर्व स्तरातून पोलिसांचे कौतूक होताना पहायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.