कारागृहातील बडदास्तीने देशभरात संतापाची लाट; शिक्षेची कुटुंबियांची मागणी
हैदराबाद : हैदराबाद येथील निर्भयाकांडातील आरोपींना तेलंगणातील अती उच्च सुरक्षा असणाऱ्या चेरलापल्ली कारागृहात हलवण्यात आले आहे. त्यांना सकाळी जेवणासाठी सकाळी डाळभात तर सायंकाळी मटणकरी दिल्याची बाब उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आरोपींना कडक शिक्षा द्या अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे.
या चारही आरोपींनी रात्र न झोपता काढली. त्यांच्यावर अहोरात्र नजर ठेवण्यात येत आहे, असे कारागृहातील सुत्रांनी सांगितले. हैदराबादमधील एका पशुचिकित्सकावर सामुहिक बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ तेलंगणात जोरदार निदर्शने होत आहेत. त्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
या आरोपींनी जाणीवपूर्वक निर्भयाची स्कूटी पंक्चर केली. त्यानंतर तिला मदत करण्याच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेले. तेथे एका झुडपामागे तिला ओढले. तेथे तिचा फोन स्वीच ऑफ केला. तीने मदतीसाठी आरडा ओरडा करताच त्यांनी तिचे तोंड दाबले. त्यानंतर ती बेशुध्द पडेपर्यंत ते आळीपाळीने तिच्यावर बलात्कार करत होते. ती परत जाण्यासाठी उठण्याचा प्रयत्न करत होती, त्यावेळी तिचे नाक दाबून तिचा खून करण्यात आला.
दरम्यान, या आरोपींच्या कुटुंबियांनीही त्यांना या गुन्ह्यासाठी शिक्षा व्हायलाच हवी असे मत व्यक्त केले. दरम्यान, एका आरोपीच्या कुटुंबियांनी तो तब्येत बरी नसल्याचे सांगून काही दिवस कामावर जात नसल्याचे सांगितले आहे. शिवा या आरोपीची आई म्हणाली, या गुन्ह्यासाठी त्याला योग्य शिक्षा व्हायला हवी. देव सगळं पाहतो. त्याला सगळं माहित असते. यातील मुख्य आरोपी महंमद याच्या पालकांनी सांगितले की 28च्या रात्री तो घरी आला. त्याने अपघात झाल्याचे सांगितले. त्याला कोणतीहीन शिक्षा करा असे त्याची आई खीन्नपणे म्हणाली.