हैद्राबाद पोलिसांवर फुलांचा वर्षाव

हैद्राबाद : हैद्राबाद बलात्कार प्रकरणात आरोपींचा एन्काऊंटर करणाऱ्या हैद्राबाद पोलिसांवर स्थानिक नागरिकांकडून फुलांचा वर्षाव केला जात आहे. अनेक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे समर्थन केले आहे. तसेच बलात्कार प्रकरणातील आरोपींना अशीच कडक शिक्षा व्हायला हवी असे मत नोंदवले आहे. तर काही कायदेतज्ज्ञांनी हा प्रकार चुकीचा असून कायदेशीर मार्गानेच त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत न्यायला हवे होते, असे म्हटले आहे.


हैद्राबादमध्ये ज्या ठिकाणी पीडित डॉक्‍टर तरुणीवर सामुहिक बालात्कार करुन तिला जिवंत जाळण्याची अमानुष घटना घडली. त्याच घटनास्थळी आज पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्या चार आरोपींना चकमकीत ठार केले. हे आरोपी पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पळत होते त्यामुळे पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणार्थ ही कारवाई केल्याचे म्हटले आहे.

पोलिसांच्या कारवाईनंतर घटनास्थळी अद्यापही मोठा पोलीस फौजफाटा तैनात असून स्थानिक नागरिकांनीही या भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. यावेळी या नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना उचलून घेत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत आनंद व्यक्त केला. तर काहींनी पोलिसांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करीत त्यांच्या कृतीचे समर्थन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.