हैदराबाद – करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने ऑगस्ट महिन्यात होणारी हैदराबाद खुली बॅडमिंटन स्पर्धा करोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) दिली.
सीरीज गटातील भारतात होत असलेल्या तीन स्पर्धांमधील ही मानाची स्पर्धा समजली जाते. मूळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा येत्या 11 ते 16 ऑगस्ट या कालावधीत होणार होती. मात्र, लॉकडाऊन कायम असल्याने व करोनाचा धोकाही संपुष्टात न आल्याने ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे.