नवी दिल्ली : इंडियन सुपर लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात यजमान ‘हैदराबाद एफसी’ने ‘मुंबई सिटी एफसी’ला १-१ ने बरोबरीत रोखले.
Late drama in Hyderabad as the hosts nick a point following a late penalty!#HFCMCFC #HeroISL #LetFootball pic.twitter.com/YAruoIxfbz
— Indian Super League (@IndSuperLeague) January 24, 2020
सामन्यात ‘मुंबई सिटी एफसी’कडून मोहम्मद लार्बीने ४३ व्या मिनिटाला गोल करत १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. सामन्याचा निर्धारित वेळ संपेपर्यत ही आघाडी कायम होती, पण हैदराबादच्या मार्को स्टानकोविचने सामन्याच्या अतिरिक्त वेळेत (९०+४) गोल करत संघास बरोबरी साधून दिली.
मुंबईचे १४ सामन्यात २० गुण झाले असून गुणतालिकेत ते पाचव्या स्थानी कायम आहे. हैदराबादने मागील १४ सामन्यात हा तिसरा सामना बरोबरीत सोडवला आहे. त्यांना मागील १२ सामन्यात एकही विजय मिळवता आला नाही. हैदराबादचा संघ ६ गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे.