हैदराबादी पतीला न्यायालयाचा दणका

पुणे – पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या उच्च शिक्षित हैदराबादी पतीला आणि त्याच्या घरच्यांना न्यायालयाने दणका दिला आहे. पतीला पोटगी स्वरूपात 10 हजार आणि भाडे स्वरूपात 10 हजार रुपये देण्याचा अंतरिम आदेश दिला आहेत. तसेच विवाहितेला कोणत्याही प्रकारे त्रास देण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पठाण यांनी हा आदेश दिला आहे.

पत्नीने महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत न्यायालयात धाव घेतली होती. पती, सासू, जाऊ आणि दोन दीर यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली. तिचे शिक्षण बीकॉम तर पतीचे शिक्षण एमटेकपर्यंत झाले आहे. पतीचे कुटुंब हे हैदराबाद येथील आहे. मे 2017 दोघांचा विवाह लाखो रुपये खर्च करून थाटामाटात करून दिला.
शारीरिकरीत्या सक्षम नसल्याची बाब पत्नीला कळाल्यानंतर त्याने त्याच्या घरच्यांसोबत तिच्या माहेरी येऊन तिला, तिच्या घरच्यांना मारहाण केली. याबाबत पोलीसआयुक्तांकडे तक्रारही करण्यात आली होती. जेव्हा न्यायालयात तक्रार दाखल करून त्याच्या शारीरिक अक्षमतेबद्दल सांगण्यात आले, तेव्हा त्याने न्यायालयात उपस्थित राहून हा मुद्दा खोडून काढला नसल्याचे पत्नीच्या वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

तिला दिला जात होता त्रास
सासरी हैदराबाद येथे नांदण्यासाठी गेल्यानंतर काही दिवसांतच सासरच्यांनी तिला त्रास देणे सुरू केले. तिला छोट्या छोट्या कामासाठी शारीरिक, मानसिक त्रास देऊ लागले. यातूनही तिने सर्व गोष्टी सहन करत त्यांच्यात आज नाही तर उद्या बदल होईल याची वाट पाहिली; परंतु परिस्थिती दिवसेंदिवस आणखीनच बिघडत गेली. त्याने तिला वर्षभराच्या आतच घरातून हाकलून दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)