हैद्राबाद एनकाऊंटर : यापूर्वीही ‘त्या’ आरोपींकडून 9 महिलांवर बलात्कार

हैद्राबाद –  हैद्राबादमध्ये महिला पशुवैद्यकीय डॉक्‍टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या करणाऱ्या चारही आरोपीचे पोलिसांनी एन्काऊंटर केला. मात्र, यासंबंधी अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. हैद्राबाद सामूहिक बलात्कारातील आरोपींची याआधीही नऊ महिलांचा बलात्कार करून त्यांना जिवंत जाळले होते. या गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली होती, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींननी नऊ महिलांवर बलात्कार करून त्यांची जाळून हत्या केली होती. चार आरोपींमधील आरोपी आरिफने ६ तर आरोपी चेन्नाकेशववुलू तीन महिलांवर बलात्कार करून हत्या केली होती. यातील काही घटना तेलंगणा-कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात झाली आहे. आरोपीना ताब्यात घेतल्यानंतर या गुन्ह्यांची कबुली देण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.

तसेच आरोपींकडून माहिती मिळालेल्या माहिती आधारे सायराबाद पोलीस अधिकाऱ्यांनी कर्नाटकमधील त्या नऊ पीडितेंची माहिती शोधण्यास सुरुवात केली आहे. आमची टीम या प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र तपास करत आहे, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, हैद्राबादमध्ये महिला पशुवैद्यकीय डॉक्‍टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या करणाऱ्या चारही आरोपीचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. आरिफ, शिवा, नवीन आणि चिन्नाकेशवुलू आरोपींनी पोलिसांची बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे चौघेही मारले गेले होते. या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच एसआयटीमार्फेत देखील याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.