हैदराबाद – तेलंगणातील हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये चारही आरोपींचा शुक्रवारी पहाटे पोलिसांनी इन्काउंटर केला. घटनेतील अधिक तपासासाठी पोलिसांनी चारही आरोपींना घटनास्थळावर आणले असताना, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेऴी बचावासाठी पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, अशी माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली.
काही जणांकडून पोलिसांच्या या कारवाईचं समर्थन केलं जात आहे. तर काही जणांकडून याला विरोध होत आहे. अशातच या कारवाईविरोधात शनिवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईविरोधात वकील सीएस मणी आणि वकील प्रदीप कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं पालन या कारवाईदरम्यान करण्यात आले नसल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या कारवाईत सहभागी असलेल्या पोलिसांविरोधात एफआयआर दाखल करण्याची आवश्यकता असून संबंधित पोलिसांवर करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
या प्रकरणी आता सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. माध्यमांवरही गॅग ऑर्डर चालवण्याची मागणी त्यांनी केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फतही याची चौकशी व्हावी, असं त्यांनी याचिकेत नमूद केले आहे.