हुश्‍श… पुण्यातील क्रिटिकल रुग्णसंख्या आता अडीचशेच्या आत

229 नवे करोना पॉझिटिव्ह

पुणे – उपचार सुरू असलेल्या करोना पॉझिटिव्हमधील क्रिटिकल रुग्णसंख्या 250 पेक्षा कमी झाली असून, ती आता 246 आहे. तर, दिवसभरात 229 पॉझिटिव्ह आढळले आहेत.

शहरातील 1 लाख 78 हजार 769 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 3317 रुग्ण ऍक्‍टिव्ह आहेत. त्यातील 152 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

शहरात आतापर्यंत 1 लाख 70 हजार 821 रुग्ण बरे झाले असून, गुरुवारी दिवसभरात 421 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर दिवसभरात 3819 जणांची स्वॅबटेस्ट करण्यात आली. बाधितांमधील 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील तिघे पुण्याबाहेरील आहेत. यांच्यासह आतापर्यंत करोनाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची एकूण संख्या 4631 झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.