पिंपरी – दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीचा चाकूने वार करून खून केला. त्यानंतर पतीनेही घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चिखली येथील कृष्णानगर येथे शनिवारी उघड झाली.
राजेंद्र प्रल्हाद भोसले (50, रा. चिखली) याने पत्नी संगीता राजेंद्र भोसले (47) यांचा खून करून आत्महत्या केली. राजेंद्र भोसले हा कॅबचालक होता. त्याला दारूचे व्यसन होते. राजेंद्र याच्या सततच्या दारू पिण्यामुळे त्याचा पत्नी संगीता यांच्यासोबत नेहमी वाद होत होता. शनिवारी दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला. त्यावेळी चिडून राजेंद्र याने पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून केला व त्यानंतर स्वत:ही घरातच पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.