पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

पिंपरी – दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीचा चाकूने वार करून खून केला. त्यानंतर पतीनेही घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना चिखली येथील कृष्णानगर येथे आज शनिवारी दि. 25 मे रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास उघड झाली.

राजेंद्र प्रल्हाद भोसले (वय-50, रा. कृष्णानगर, चिखली) याने पत्नी संगीता राजेंद्र भोसले (वय-47) यांचा खूप करुन आत्महत्या केली. याबाबत चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र भोसले हे कॅब चालक होते. त्यांना दारूचे व्यसन होते. राजेंद्र यांच्या सततच्या दारु पिण्यामुळे त्यांचा पत्नी संगीता यांच्यासोबत नेहमी वाद होत होता.

पत्नी त्यांना दारू पिऊन मोटार चालवित जावू नका, असे वारंवार सांगत होती. तसेच संगीता यांना सत्संगाची आवड असल्यामुळे राजेंद्र यांच्या दारूच्या व्यसनावरून त्यांच्यामध्ये नेहमी वाद होत होते. शनिवारी दुपारी दोघांमध्ये याच कारणावरुन वाद झाला. त्यावेळी चिडून राजेंद्र यांनी पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून केला व त्यानंतर स्वत: ही घरातच पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. भोसले दाम्पत्याला दोन मुले असून एकाचे लग्न झाले आहे. तो रावेत येथे राहण्यास होता. तर एकजण आई-वडिलांसोबतच राहत होता. या प्रकरणाचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×