नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज विवाहबाह्य संबंध प्रकरणात एक मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणात विवाहबाह्य संबंधात असलेल्या महिलेला आरोपी म्हणत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु पतीसोबत विवाहसंबंध असलेल्या विवाहितेवर किंवा प्रेयसीवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
तसेच विवाहबाह्य संबंधात असलेली स्त्री कलम 498A IPC अंतर्गत “नातेवाईक” या संज्ञेच्या कक्षेत येत नाही असेदेखील न्यायालयाने म्हंटले आहे. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती के. व्ही.विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा मोठा निर्णय दिला आहे.
काय होते प्रकरण?
तक्रार करणाऱ्या महिलेच्या पतीचं एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे या महिलेने पतीच्या प्रेयसीवर आरोप करत तिच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला होता. मात्र सुप्रीम कोर्टाकडून हा गुन्हा रद्द करण्यात आला.
कोर्टाने काय दिला निर्णय?
निर्णय देताना खंडपीठाने सांगितले की,”एखादी प्रेयसी किंवा एखादी स्त्री ज्याच्याशी पुरुषाने विवाहबाह्य प्रणय किंवा लैंगिक संबंध ठेवले आहेत तिला नातेवाईक मानले जाऊ शकत नाही. यात केवळ रक्ताचं नातं नाही किंवा दत्तक घेतलं असेल त्या व्यक्तीला “नातेवाईक” मानले जाऊ शकतं नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय.
तसेच ज्या महिलेवर आरोप ठेवण्यात आले आहेत, त्या महिलेने ज्या पुरुषासोबत संबंध होते, त्याच्या पत्नीला कोणताही त्रास दिला असं कुठेच सिद्ध करणारे कोणतेच पुरावे मिळून आले नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे.