प्रियांकाच्या कामावरून पती निक झाला खुष

प्रियांका चोप्रा युनिसेफची गुडविल ऍम्बेसेडर आहे. तिच्या या कामाबद्दल तिचा नवरा अमेरिकेतील गायक अभिनेता निक जोनास बेहद्द खुष झाला आहे. अदीस अबाबामधील सिबिस्टे नेगासी इथल्या प्राथमिक शाळेमध्ये प्रियांकाने भेट दिली होती, तेंव्हा प्रियांकाने केलेल्या पोस्टला निकने रिट्विट केले आहे. या शळेतल्या मुलांबरोबर गप्पागोष्टी करताना प्रियांका दिसते आहे.

गुडविल ऍम्बेसेडर म्हणून इथिओपियामध्ये प्रियांका करत असलेल्या कामावरून आपण खूप प्रभावित झालो असल्याचे त्याने म्हटले आहे. तिचे काम आपल्याबरोबर जगभरातील हजारोजणांसाठी प्रेरणादायी आहे. तिचे काम विलक्षण आहे, असे निकने म्हटले आहे. या कामाच्या निमित्ताने प्रियांकाने जेथे जेथे भेट दिली, तेथील व्हिडीओ आणि फोटो तिने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

गरिबी, यौन शोषण, हिंसा आणि बालविवाहाच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी तिने या पोस्टच्या माध्यमातून बरीच चर्चाही केली आहे. शाळेतल्या मुलांबरोबर गप्पा मारल्यानंतर तिने इथियोपियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा साहले वर्क जेऊडे यांचीही भेट घेतली. गेल्या वर्षी प्रियांका रोहिंग्या मुस्लिमांची भेट घेण्यासाठी बांग्लादेशातही गेली होती. प्रियांका चोप्रा 2016 मध्ये युनिसेफची गुडविल ऍम्बेसेडर बनली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.