साताऱ्यात पतीचे पत्नी सोबत कडाक्याचे भांडण; संतापलेल्या पतीने 10 घरांना लावली आग

सातारा – पाटण तालुक्यातील माजगाव येथे पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण झाल्यानंतर संतापलेल्या पतीने घरे स्वतःचे घरु जाळून टाकले आहे. हे घर जळताना आ़जूबाजूच्या दहा घरांना आग लागून यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी नवऱ्याला चांगलाच चोप दिला आहे.

संजय पाटील व त्याची पत्नी पल्लवी पाटील असे पती-पत्नीचे नाव असून या प्रकरणी संबंधित पती विरुद्ध गुन्हा दाखल करत त्यास मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

या दोघांचे घरगुती कारणातून भांडण सुरू होती. भांडण एवढ्या टोकाला गेले की पतीने स्वतःच्या घराला आग लावली. आग लावली तेंव्हा घरातील सिलेंडर ने ही पेट घेतला. नंतर या आगीने रुद्र रूप धारण करत आजूबाजूच्या सुमारे दहा घरांना त्याचा फटका बसला आहे. आजूबाजूची सुमारे दहा घरे जळून खाक झाली. या आगीत सुमारे पन्नास लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असून आजूबाजूचे दहा घरे जळून खाक झाली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.