कराड – चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात कुर्हाडीने वार करून खून केला. ही घटना येवती ता. कराड येथे काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली . सौ. रेखा विनोद कांबळे (वय 35 रा. येवती) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पती विनोद रामचंद्र कांबळे (वय ४०) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.