pune crime : विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात पती, सासू-सासऱ्यासह चौघांना अटकपूर्व

पुणे – विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणात पती, सासू-सासरे आणि पतीच्या मामाला अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांनी मंजुर केला आहे. आत्महत्येची घटना 7 नोव्हेंबर रोजी घटना घडली आहे.

मात्र, विलंबाने 11 नोव्हेंबर 2021 रोजी गुन्हा दाखल आहे. फिर्यादी मुलीची आई आहे. मुलीने प्रेमविवाह केला आहे. लग्नाच्या पन्नास दिवस आधीच घर सोडले होते. त्यानंतर आईला वारंवार भेटण्यासाठी आणि लग्नासाठी ती बोलावत होती. मात्र, आई संबंध तोडल्याचे सांगत होती.

आईच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. त्यामुळे चौघांना अटक करण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन द्यावा, असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे ऍड. एन.डी पाटील आणि ऍड. पुष्कर पाटील यांनी केला. आई तिचे संबंध व्यवस्थित नव्हते.

हे दाखविण्यासाठी बचाव पक्षातर्फे दोघींच्या संवादाची ऑडीओही न्यायालयात दाखल करण्यात आली. पती कौस्तुभ (वय 22), सासू सुजाता (वय 42) आणि सासरे महेंद्र विश्‍वास पवार (वय 49, सर्वजण, रा. धनकवडी) आणि मुलाचा मामा नवनाथ मनसिंग भोसले (वय 38, धनकवडी) या चौघांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

रेवती (वय 19) हिच्या आत्महत्या प्रकरणात तिची आई (रा. बाबडा, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी फिर्याद इली आहे. 20 मे रोजी तिचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर सासरच्या मंडळीने “आईकडून पैसे घेऊन ये’ या कारणाने त्रास दिल्याने तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.