पिंपरी – संशयी पती आणि दिराने विवाहितेचे केस कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच हुंड्यासाठी तिचा छळही करण्यात आला. ही घटना घरकुल, चिखली येथे घडली.
पती शैलेश सुभाष कांबळे आणि मंगेश सुभाष कांबळे (सध्या रा. खडकी. तसेच विघ्नहर्ता हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) अशी आरोपींची नावे आहे. याबाबत विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना नोव्हेंबर 2000 ते 2018 या कालावधीत घरकुल आणि खडकी येथे घडली.
आरोपी पती आणि दिर फिर्यादी यांच्यावर वेळोवेळी संशय घेत असे. तसेच विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करीत उपाशीही ठेवत असे. तसेच तिचे केस कापून तिला मानसिक व शाररीक त्रास दिला.
तसेच फिर्यादी यांनी आरोपींच्या सांगण्यावरून माहेराहून पैसे व दागिने न आणल्याने तिला नांदविण्यास नकार दिला.