पुणे : पत्नीच्या खोट्या तक्रारींना व नातेवाईकांमध्ये, कंपनीमध्ये झालेल्या बदनामीला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने विष प्राषण करून आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्यानंतर पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश संभाजी चौघुले (33) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी स्नेहल प्रकाश चौघुले (28, गीरीधर आंगण माई मंगेशकर हॉस्पीटल जवळ, वारजे) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गीरीष संभाजी चौघुले (30, रा. गीरीधर आंगण, माई मंगेशकर हॉस्पीटल जवळ वारजे) यांनी भावाच्या मृत्यूप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 29 सप्टेंबर रोजी घडला.