Hurun List: 11.6 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह, गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकून 2024 च्या हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये पहिले स्थान मिळवले. हुरुन इंडियाच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी भारतात दर 5 दिवसांनी एक नवीन अब्जाधीश निर्माण झाला. अहवालात 31 जुलै 2024 पर्यंतच्या मालमत्तेची गणना केली आहे.
हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद म्हणाले, “भारत आशियातील संपत्ती निर्मिती इंजिन म्हणून उदयास येत आहे, चीनमध्ये अब्जाधीशांच्या संख्येत 25% घट झाली आहे, तर भारतात 29% वाढ झाली आहे आणि अब्जाधीशांची संख्या विक्रमी 334 वर पोहोचली आहे.”
10,14,700 कोटी रुपयांच्या संपत्तीसह 2024 च्या हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर आहेत. एचसीएल टेक्नॉलॉजीजचे शिव नाडर आणि कुटुंब या वर्षी 314,000 कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे लस निर्माता सायरस एस पूनावाला आणि कुटुंब या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्यांच्यानंतर सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे दिलीप सांघवी आहेत. गेल्या पाच वर्षांत सहा जण सातत्याने भारतातील टॉप 10 मध्ये राहिले आहेत. या यादीत गौतम अदानी कुटुंब पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मुकेश अंबानी कुटुंब, शिव नाडर, सायरस एस पूनावाला आणि कुटुंब, गोपीचंद हिंदुजा आणि कुटुंब आणि राधाकिशन दमानी आणि कुटुंब आहे.
झेप्टोचे कैवल्य वोहरा हे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश –
2024 च्या हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये सर्वात तरुण 21 वर्षीय कैवल्य वोहरा आहे, जो 5 अब्ज डाॅलरच्या क्विक कॉमर्स स्टार्टअप Zepto चालवतो. त्यांचे सह-संस्थापक 22 वर्षीय आदित पालिचा या यादीतील दुसरे सर्वात तरुण आहेत.
या यादीत शाहरुख खानचे नाव प्रथमच सामील –
भारतीय चित्रपट स्टार शाहरुख खान पहिल्यांदाच हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये आला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्समधील त्याच्या स्टेकचे वाढते मूल्य हे आहे. मनोरंजन उद्योगातील Hurun India Rich Listers मध्ये अवघ्या एका वर्षात 40,500 कोटी रुपयांची भर घातली आहे. या क्षेत्रातील सात जणांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.