लगीनघाई सुरू..! कियारा आणि सिद्धार्थ लवकरच अडकणार लग्नबेडीत?

मुंबई – सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी बऱ्याच दिवसांपासून डेटिंग करत आहेत. “शेरशाह’ रिलीज झाल्यापासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराच्या जोडीबाबत त्यांचे फॅन्स खूपच एक्‍साईटेड आहेत. 

“शेरशाह’मध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कारगिल युद्धातील हिरो कॅप्टन विजय बत्रा यांचा रोल केला होता. तर कियारा आडवाणी विक्रम बत्रा यांची गर्लफ्रेंड डिंपल चीमाच्या” रोलमध्ये” दिसली होती. आता सिद्धार्थ आणि कियारा या दोघांच्या लग्नाच्या प्लॅनची घोषणा कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

स्वतः सिद्धार्थने याबाबत मौन सोडले आहे. लग्न कधी होईल हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही. कोणाबरोबर होईल हे देखील मला आता सांगता येणार नाही. मात्र जेव्हा होईल तेव्हा मी नक्की सांगेन, असे तो म्हणाला. कियाराबाबत बोलताना त्याने तिचे खूप कौतुक केले. 

“ऑफ स्क्रीन’ ती खूपच वेगळी असते. ती फिल्म ऍक्‍ट्रेस आहे, हे एरवी कोणाला सांगूनही पटणार नाही. ती खूपच साधी आणि नॉर्मल असते. तिचा हा गुणच आपल्याला खूप आवडला असल्याचे सिद्धार्थने सांगितले. कियाराबरोबर एका लव्ह स्टोरी फिल्ममध्ये काम करण्याची इच्छा असल्याचेही त्याने सांगितले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.