कंगनाला भोवली ट्विट करायची घाई; दादासाहेब फाळके यांचा उल्लेख चक्क “बाबासाहेब”

मुंबई – सिनेअभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध शिवसेना असा वाद मुंंबईत काही दिवस प्रचंंड चर्चेत होता अजुनही त्यावर उत्तर असे समोर आलेले नाही. दोन दिवसांपूर्वीच कंगना मुंबईवरून पुन्हा आपल्या गावी मनालीला परतली आहे. मात्र, जाताजाता कंगनाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सोबतच आपल्यासोबत घडलेल्या अन्यायाबाबत मत मांडले आहे.

याच पार्शवभूमीवर कंगनाने कंगनाने सोशल मीडियावर काही ट्विट शेअर केले. दरम्यान, आपल्या वर होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देताना तिच्याकडून मोठी घोडचूक झाली आहे. तिने दादासाहेब फाळके यांचा उल्लेख चक्क “बाबासाहेब फाळके” असा केला आहे. यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.

ट्विटरवर मनीष अग्रवाल यांनी कंगनावर केलेल्या आरोपांनंतर तिने यावर उत्तर दिले. ‘इंडस्ट्री फक्त करण जोहर आणि त्याच्या वडिलांनी निर्माण केली नाही. तर बाबासाहेब फाळकेंपासून ते प्रत्येक कलाकार आणि मजुराने उभी केली आहे.’ अश्या आशयाचे ट्विट कंगनाने केले. मात्र, या ट्विटमध्ये दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब केल्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.