ट्रम्प यांच्या प्रस्तावाचे हुर्रियतकडून स्वागत

श्रीनगर -काश्‍मीर मुद्‌द्‌यावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करण्याविषयी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या प्रस्तावाचे हुर्रियत कॉन्फरन्स या विभाजनवादी संघटनेच्या मवाळ गटाने स्वागत केले आहे. त्या मुद्‌द्‌यामुळे काश्‍मिरी जनता सर्वांधिक प्रभावित झाली आहे. सर्व स्तरांवरील चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याला काश्‍मिरी जनतेने नेहमीच अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे त्या दिशेने होणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाचे स्वागत आहे.

काश्‍मीर मुद्दा राजकीय स्वरूपाचा असून मानवतावादाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. मागील सात दशकांपासून प्रलंबित असणाऱ्या त्या मुद्‌द्‌यावर तोडगा निघणे आवश्‍यक आहे. काश्‍मीर मुद्‌द्‌यावरील तोडग्यामुळे राजकीय अनिश्‍चितता संपुष्टात येईल. तसेच, काश्‍मिरी जनतेच्या यातना संपतील, असे हुर्रियतने म्हटले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.