टोकियो – हैशेन चक्रिवादळामुळे जपानच्या दक्षिणेकडील किनारपट्टीला आज मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने जोरदार तडाखा दिला. या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांची छपरे उडून गेली आणि वीजपुरवठाही खंडीत झाला.
हैशेन चक्रिवादळ उत्तरेकडे सरकल्यावर पावसाचा जोर आणखीन वाढला असून त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे भूस्खलनही झाले आहे.
या हैशेन वादळाचा गंभीर संभाव्य परिणाम लक्षात घेऊन काही दिवस अगोदरच या संदर्भातील इशारा देण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित आश्रय घेत आहेत आणि अन्न-पाण्याचा साठाही करून ठेवला जात आहे.
दक्षिण पश्चिमेकडील क्योश्यू बेटावरच्या काही नद्यांना पूर आलेला असून लवकरच या पूराचे स्वरुप अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील बऱ्याच भागातून नागरिकांना सुखरूप ठिकाणी हलवले जात असून ओकिनावा आणि क्योश्यूमधील 50 हजार नागरिकांना आतापर्यंत कागोशिमा आणि नागासाकी येथील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.