नवी दिल्ली – भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, असनी चक्रीवादळाने त्याचा मार्ग बदलला आहे. आता ते काकीनाडा आणि विशाखापट्टणम दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला स्पर्श करण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर IMD ने आंध्र प्रदेशसाठी “रेड” अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळ संबंधित आपत्ती टाळण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाई करणे आवश्यक असल्याचे आयएमडीने म्हंटले आहे.
#WATCH पश्चिम बंगाल: चक्रवात ‘असानी’ के कारण पश्चिम बंगाल के कुछ हिस्सों में बारिश जारी है। वीडियो दुर्गापुर इलाके से है। pic.twitter.com/jpEHn1i5tE
— ANI_HindiNews (@AHindinews) May 10, 2022
दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेले आसनी चक्रीवादळ आंध्र प्रदेश, ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये कहर करत आहे. त्याच्या प्रभावामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वादळी पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. समुद्रात उंच लाटा उसळत असल्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असनीच्या पार्श्वभूमीवर ओडिशा ते आंध्र प्रदेश सरकार हाय अलर्टवर आहे.