इस्तवान पेनीला 50 मी. रायफल तीन पोझिशनचे विजेतेपद

नवी दिल्ली -हंगेरिच्या इस्तवान पेनीने येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शूटिंग विश्‍वचषक स्पर्धेतील 50 मी रायफल तीन पोझिशनमशील पुरुष विभागात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले असून या प्रकारात एकाही भारतीय खेळाडूला पात्रता फेरीचा अडथळा पार करता आला नाही.

यावेळी डॉ. कर्नी सिंग शूटिंग रेंज येथे झालेल्या सामन्यांमध्ये 22 वर्षीय इस्तवानने 459.1 गुण पटकावताना प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक आपल्या नावे केले. तर, रशियाच्या सर्जी कामेंस्कीने 459 गुण कमावत रौप्य आणि इटलीच्या मार्को दि निकोलोने 444.5 गुण कमावत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. या पदकांसहीत या तिन्ही खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत आपले स्थान पक्‍के केले आहे. यावेळी भारतीय संघातील पारुल कुमारला 22 व्या तर राजपुतला 25 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Leave A Reply

Your email address will not be published.