पुणे : शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, कात्रज कोंढवा येथे पुलाखाली उभे केलेले शेकडो वाहने पाण्यात वाहून गेल्याची घटना आता समोर येत आहे.
कात्रज पुलाखाली उभ्या करण्यात आलेले 50 हुन अधिक चारचाकी आणि दुचाकी वाहुन गेल्या. एका ज्येष्ठ महिलेस तिला वाचवण्याचा प्रयत्न करणारी व्यक्तीदेखील वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. लेक टाऊन येथील 10 दुचाकी वाहून गेल्या तसेच सिमेंटचा रस्त्या वाहून गेला. त्यामुळे लेक टाऊनकडून राजस सोसायटी कडे जाणारा रस्ता आता पुढील काही महिने बंद राहणार