नाझी मृत्यूछावण्यांवर नवा “छाया’झोत

क्रुर दहशतीवर प्रकाशझोत टाकणारी 361 छायाचित्रे इतिहासकारांकडे

बर्लीन : सोबीबोर येथील मृत्यू छावण्यातील छायाचित्रांसह नव्याने प्रकाशझोतात आलेली शेकडो छायायचित्रे मानवतेवर नाझींनी केलल्या क्रुर आक्रमाणाची साक्ष देतात, असे प्रतिपादन दहशतीचा आकृतीबंध स्पष्ट करणाऱ्या बर्लीन वस्तुसंग्रहालयात इतिहासकारांनी व्यक्त केला.

नाझी व्याप्त पोलंडमधील सोबीबोर छळ छावण्यातील ही छायाचित्रे हा दुसऱ्या महायुध्दानंतर 75 वर्षांनी अमानुषतेच्या कळसाध्यायाची साक्ष देतात, असे इतिहासकारांनी म्हटले आहे. सोबीबोरविषयी हयताभर नाकारणार नाझी जवान जॉन डेमजानजुक हाही नव्याने प्रकाशीत झालेल्या 361 छायाचित्रात आढळत आहे. काही लिखीत कागदपत्रेही सापडली आहेत. नाझी सुरक्षा दलाचा अधिकारी जोहानान नायमॅन याच्या वंशजांनी ही कागदपत्रे आणि छायाचित्रे शोधून काढली. ती त्यांनी स्टूटगार्ट विद्यापीठातील इतिहास संशोधक मार्टीन क्‍युपेर्स यांच्याकडे सोपवली.

सोबीबोर छळ छावण्या
सोबीबोर छळ छावण्या

क्‍यपेर्स यांनी या छायाचित्रांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. नाझीव्याप्त पोलंडमधील प्रलयंकारी अत्याचार किती पराकोटीचा होता, याची ही छायाचित्रे साक्ष देतात. हे वस्तुसंग्रहालय नाझी संरक्षण दल आणि गुप्तचर खात्याचे मुख्यालय असणाऱ्या गेस्टापो मुख्यालयाच्या जागेवर उभारण्यात आले आहे.

बेलझेक, ट्रबलिंका अीाण सोबीबोर येथील छळछावण्यात सुमारे 18 लाख ज्यूंची हत्या करण्यात आली होती. ऑपरेशन रेनहार्ड अंतर्गत राबवलेल्या या नरसंहारावर अद्याप पुरेसा प्रकाश झोत पडलेला नाही.

यापुर्वी सोबीबोर छावणीची केवळ दोन छायाचित्रे होती. नायमॅन यांच्या छायाचित्रांमुळे त्यांची संख्या 49 वर पोहोचली आहे, असे या ठीकाणी दौरे आयोजित करणाऱ्या स्टीफन हेनस्चेन यांनी सांगितले. या दोन छायाचित्रात जॉन डेमजानजुक दिसत असण्याची शक्‍यता आहे. डेमजानजुक यांच्यावर 30 हजारांहून अधिक ज्यूंची हत्या केल्याचा आरोप होता. त्याच्या अपिलावर सुनावणी प्रलंबित असतानाच त्यांचे निधन झाले. युक्रेनमध्ये 1920 मध्ये जन्मलेले डेमजानजुक महायुध्दानंतर अमेरिकेत स्थायिक झाले होते.

युक्रेनमधील ट्रबलिंका येथील कुख्यात छळछावणीसाठी त्यांच्यावर जेरूसेलेम येथे खटला चालवण्गयात आला. त्यांना ठोठावलेली फाशी इस्रायली सर्वोच्च न्यायलयाने 1993 मध्ये रद्द केली. त्यांनी महायुध्दाचे रेकॉर्ड देण्याचे कारण दाखवत 2002मध्ये अमेरिकन नागरिकत्व मागितले होते. त्यांना 2009 मध्ये जर्मनीच्या ताब्यात देण्यात आले. तेथे त्यांना पाच वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निर्णय जर्मनीतील न्याव्यवस्थेतील महत्त्वाचा निर्णय मानला जातो. त्याने कारागृहाचा संरक्षक म्हणून आदेशाची अंमलबजावणी केली, असे न्यायलयाने अधोरेखीत केले.
दि डेव्हील नेक्‍स्ट डोअर या नेटीफ्लिक्‍सचा माहितीपट त्यांच्यावर काढण्यात आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.