करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अर्थात काही दिवसांपूर्वीच यात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण काळात बॉलिवूडचे सर्वच सेलिब्रेटी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. प्रत्येकजण रोज त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. अशात मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने तिच्या घरात भूत दिसल्याचे म्हटले आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ सुरुवातीचे काही सेकंद खूपच भीतीदायक आहे. नम्रता शिरोडकरने तिच्या इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिच्या घरात एक मुलगी दिसत आहे. जिचा चेहरा केसांनी झाकलेला आहे.
ती मुलगी हळूहळू चालत पुढे येताना दिसते. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला खूपच भीतीदायक म्युझिक सुरू आहे. नम्रताने शेअर केलेला हा व्हिडीओ सर्वांना खूप भीतीदायक वाटत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.